जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस वणी तालुक्यासाठी दिलासादायक ठरले. आज यवतमाळ हून आलेल्या 60 पैकी 60 ही रिपोर्टमध्ये कुणीही पॉजिटिव्ह आले नाही. शिवाय आज 11 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आज केवळ एकच रुग्ण आढळून आला. हा रुग्ण बाबापूर येथील आहे. मात्र ग्रामीण भागात कोरोना पाय पसरताना दिसत आहे. या आठवड्यात अधिकाधिक रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 36 आहेत.
आज 60 संशयीतांचे यवतमाळ येथून रिपोर्ट प्राप्त झालेत. यात सर्व व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 18 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 1 पॉजिटिव्ह आढळून आला तर इतर व्यक्ती निगेटिव्ह आलेत.
सध्या तालुक्यात 36 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 4 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 16 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 16 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1253 रुग्ण आढळून आलेत. यातील 1192 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
हे देखील वाचा:
धक्कादायक: घरातील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन शिक्षिकेची आत्महत्या