जब्बार चीनी, वणी: शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला गांधी चौक इथे शुक्रवारी कोरोनाचा 1 तर आज 3 रुग्ण आढळून आले आहेत. गांधी चौकात बाजाराच्या निमित्ताने येणा-या जाणा-यांची संख्या लक्षणीय आहे. आठवडी बाजार बंद झाल्याने ग्रामीण भागातील अनेक मुख्य बाजारपेठेतूनच खरेदी करतात. पॉजिटिव्ह आलेल सर्व रुग्ण हे व्यापारी वर्गातील असल्याने ही चिंताजनक बाब ठरू शकते.
आज यवतमाळ हून एकही रिपोर्ट प्राप्त झालेला नाही. तर आज 51 जणांची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यातील 3 रुग्ण पॉजिटिव्ह आलेत. तर 48 रुग्ण निगेटिव्ह आलेत. पॉजिटिव्ह आलेले सर्व रुग्ण हे गांधी चौकातील आहेत. कालही गांधी चौकात एक रुग्ण आढळून आला होता. आजची दिलासादायक बाब म्हणजे आज तब्बल 10 रुग्ण रिकव्हर झालेत. त्यामुळे कोरोना रुग्णाची ऍक्टिव्ह संख्या कमी झाली. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 25 आहेत.
गांधी चौक ठरतोय हॉटस्पॉट !
चार दिवसांआधी गांधी चौकातील एका व्यापा-याचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसातच गांधी चौकात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. पॉजिटिव्ह आलेले रुग्ण हे देखील व्यापारी वर्गातील आहेत. गांधी चौकात मोठ्या संख्येने ग्राहक येतात. त्यात ग्रामीण भागातील ग्राहकांचा देखील मोठा सहभाग असतो. गांधी चौकात सततचे वाढणारे रुग्ण ही चिंताजनक बाब ठरत आहे.
सध्या तालुक्यात 27 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 6 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 13 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 8 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1257 रुग्ण आढळून आलेत. यातील 1205 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात कोरोनाचा उपचार घेताना बाहेर जिल्ह्यात मृत्यू झालेल्यांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा: