दुसरी लाट वेगाने ओसरतेय, सलग दुस-या दिवशी एकही रुग्ण नाही

आता तालुक्यात अवघे 26 ऍक्टिव्ह रुग्ण

0
Jadhao Clinic

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे एकही रुग्ण आढळले नाहीत. काल देखील एकही रुग्ण नव्हता. याशिवाय आज 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या रुग्णसंख्येवरून तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 26 झाली आहे. आज जरी यवतमाळहून एकही रिपोर्ट प्राप्त झाला नसला तरीही आज 95 संशयीतांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात सर्व संशयीत निगेटिव्ह आलेत. हा एक दिलासा मानला जातोय.

आज यवतमाळ येथे 46 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 81 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे 26 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 2 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 17 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 7 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

तालुक्यात कोरोनाचे एकूण 5250 रुग्ण आढळून आलेत. यातील 5131 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

पी दारु, पी दारू…बहुत दिनो के बाद मिली है यह “दारु’

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

बेपत्ता झालेल्या तरुणाचा अखेर सापडला मृतदेह

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!