संगीता नाकले यांची महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड

काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्याने झाली निवड

0

सुशील ओझा, झरी: पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता केशव नाकले यांची झरी तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संगीता नाकले सभापती पदावर असताना गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यात नेहमी अग्रेसर होत्या. गरीब जनतेच्या योजना लोकांपर्यंत पोहचविणे, शालेय समस्या सोडविणे, त्यामुळे त्या तालुक्यात सर्वसामान्य लोकांच्या मनात घर करण्यात यश प्राप्त केले होते.

त्यांची पक्षाशी एकनिष्ठता पक्षात लोकांना जोडण्याचे कार्य आजही करीत असल्याने काँग्रेस पक्षात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या पक्षबाबतची चळवळ व एकनिष्ठ कार्य बघून संगीता नाकले यांची महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या निवडीचे श्रेय माजी आमदार वामनराव कासावार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, ता काँ अध्यक्ष आशीष कुळसंगे, प्रकाश कासावार, राजू येलटीवार, रामन्ना येलटीवार, संदीप बुरेवार, नीलेश येलटीवार, भुमारेडडी बाजलावार, हरीदास गुर्जलवार यांना देतात. अध्यक्षपदी निवड झाल्याने महीला सक्षमीकरणावर भर देणार, पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नाकले यांनी सांगितले.

हेदेखील वाचा

दारूची अवैधरित्या वाहतूक करणा-या तरुणाला अटक

हेदेखील वाचा

बेपत्ता झालेल्या तरुणाचा अखेर सापडला मृतदेह

हेदेखील वाचा

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

 

Leave A Reply

Your email address will not be published.