जब्बार चीनी, वणी: आज कोरोनाने दुस-या लाटेतील रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज आज दिनांक 9 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 64 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 32 तर ग्रामीण भागातील 29 रुग्णांचा समावेश आहे. तर 4 रुग्ण मारेगाव तालुक्यातील आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 239 झाली आहे. वणी आणि शेजारच्या चिखलगाव, गणेशपूर येथे सातत्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या ही एक चिंताजनक बाब ठरत आहे.
आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील वसंत गंगा विहार येथे 6 रुग्ण, स्नेह नगर येथे 3 रुग्ण तर जैन ले आऊट व रंगारीपुरा इथे प्रत्येकी 2 रुग्ण आले. याशिवाय भीम नगर, गुरुनगर, सिंधी कॉलनी, इंदिरा चौक, रंगनाथ नगर, मोमिनपुरा, शास्त्रीनगर, तेली फैल, सावरकर चौक, पंचशील नगर, एकता नगर, प्रगती नगर, साई नगरी, टागोर चौक, टिळक नगर, टागोर चौक, गोकुल नगर, सुभाष चंद्र बोस चौक इ ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.
ग्रामीण भागात छोरीया ले आउट गणेशपूर व चिखलगाव येथे प्रत्येकी 7 रुग्ण, भालर टाऊनशीप येथे 3 रुग्ण भूमी पार्क लालगुडा, नांदेपेरा, राजूर कॉलरी येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर शिंदोला, निवली, परसोनी, भालर, वागदरा, मानकी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर 4 रुग्ण मारेगाव तालुक्यातील आहेत.
आज यवतमाळ येथून 358 अहवाल प्राप्त झाले. यात 28 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात तर 330 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. याशिवाय आज 115 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 36 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 79 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 208 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 900 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली.
सध्या तालुक्यात 239 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 61 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 142 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 36 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1747 रुग्ण आढळून आलेत. यातील 1482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा: