सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दिग्रस ग्रामपंचायतीमध्ये कोविड 19 चा लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. शासनाने जिल्ह्यातील प्रत्येक गावातील लसीकरण 100 टक्के करण्याची मोहीम सुरू असून तालुक्यातील प्रत्येक गावात लसीकरण व्हावे याकरिता अनेक ग्रामपंचायत व आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. याच अनुषंगाने 3 जुलै रोजी दिग्रस ग्रामपंचायतीमध्ये कोविशील्ड लसीकरणचा पहिल्या डोस करिता लसीकरण करण्यात आले. सरपंच निलेश येल्टीवार व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू आहे.
लसीकरणात पहिल्या दिवशी पाहिल्या 174 लोकांनी लस घेतली तर दूसरा डोस 6 जणांनी घेतले असे एकूण 180 लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम बिरादार, आरोग्य सेविका विद्या बावनकुळे, आशा गट प्रवर्तक तबस्सुम शेख फरीद, आशा वर्कर रेणुका कावटवार, सरपंच निलेश येल्टीवार, पोलीस पाटील नंदू कुंटलवार, कर्मचारी उपेश कुंटलवार, महेश कावटवार, शेखर पालावार, चेतन येन्नावार, तंटामुक्ती अध्यक्ष रजनीकांत सुरकुंटवार यांच्या उपस्थितीत लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोकरेड्डी सुरकुंटवार, सुरेश पालावार, विठ्ठल येन्नावार, राजू नल्लावार, विकल सुरकुंटवार,अनिल सुरकुंटवार, इस्तारी तुमाने, अनिल कुंटलवार, नविन गड्डमवार, विवेक सुरकुंटवार आदींनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा:
गॅस सिलिंडर व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन