जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मोमीनपुरा व रजानगर भागात धाड टाकून वणी पोलिसांनी 370 किलो प्रतिबंधित गौमांस जप्त केला. पोलिसांनी गौवंश कत्तल करुन मांस विकणाऱ्या 7 जणांना दोन्ही ठिकाणहून अटक केली आहे.
राज्यात गौवंश हत्या व गौमांस विक्रीवर प्रतिबंध आहे. असे असताना शहरात गौमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार शाम सोनटक्के याना मिळाली होती. माहितीवरून ठाणेदार सोनटक्के यांनी पोलीस स्टाफसह रविवार 23 जानेवारी रोजी पहाटे मोमीनपुरा व रजानगर भागात धाड टाकली. पोलिसांनी तेथील काही राहत्या घरात साठवून ठेवलेला 51800 रुपये किमतीचा 370 किलो गौमांस जप्त केला.
अवैध गौमांस साठवणूक व विक्री प्रकरणी पोलिसांनी मोमीनपुरा येथून मो.नसीर अ. रशीद, अनिस अब्दुल रशीद कुरेशी, मो. कैसर अ. अजीज कुरेशी, मो.पाशा अ. अजीज कुरेशी, मो. एजाज अ. अजीज कुरेशी व अब्दुल वासे अ. वाहिद याना अटक केली. तर रजानगर भागातून मो. इस्तीयाक अ. वहाब कुरेशी याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपी विरुद्द महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायदा कलम 5 (ब) (क), 9, 9 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात पोनि शाम सोनटक्के, पीएसआय प्रवीण हिरे, शिवाजी टिपूर्णे, अशोक टेकाडे, हरींदर भारती, विशाल गेडाम, अमोल अनेलवार, प्रगती काकडे, छाया उमरे यांनी यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास पीएसआय प्रवीण हिरे व शिवाजी टिपूर्णे करीत आहे.
हे देखील वाचा-
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.