घोन्सा येथे 15 किलो गोमांस जप्त

तीन गोमांस तस्कर गाडी सोडून फरार

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या घोंसा गावामध्ये मुकुटबन पोलिसांनी १५ किलो मांस पकडले. हे मांस गोमांंस असल्याची शक्यता आहे. शुक्रवारी ही कार्यवाही करण्यात आली. यात पोलिसांनी दोन दुचाकी जप्त केली असली तरी गोमांस तस्कर मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.

घोंसा येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात परिसरातील अनेक गावातील लोक भाजीपाला व इतर सामान खरेदी करण्याकरिता येतात. यात काही गोमांस खाणारे शौकीन लोकसुद्धा असतात. त्यामुळे येथे गोमांस तस्कर सक्रीय आहे. ते दुचाकीवर २० ते ३० किलो गोमांस आणून या बाजारात लपून विकतात.

२८ सप्टेंबर शुक्रवारी सकाळी ९.३०  वाजता घोन्सा येथील बजरंग दलचे अध्यक्ष हर्षवर्धन उत्तम बोढाले हे बाजारात असताना त्यांना माहिती मिळाली की पंचशील नगर जवळील मुरार यांच्या घरासमोरील रोडवर मोटर सायकल क्रमांक एम एच २९ बी ए, २०३८ प्याशन प्रो या गाडीवर तीन अनोळखी व्यक्ती पोत्यासारखे थैली बांधून संशयीतरित्या मांस आणून विक्री करीत आहे.

मिऴालेल्या माहिती वरून बोढाले मांस असलेल्या गाडी जवळ गेले असता तिथे तीन अनोळखी इसम होते. त्यांत्या गाडीवर रक्ताने माखलेली झोळी होती.  यावरून त्या झोळीत कशाचे तरी मांस असल्याची शंका आली. त्या अनोळखी इसमांना बोढाले यांनी विचारले असता तिघे  दुचाकी व मासाने भरलेली झोळी सोडून पळून गेले.

बोढाले यांनी याबाबतची माहिती तथा तक्रार मुकुटबन पोलिसांना दिली. यावरूव पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी १५ किलो मांस ज्याची अंदाजे किंमत 3 हजार व ३० हजाराची मोटर सायकल अशी 33 हजारांचा मुद्देमाल  जप्त करून ठाण्यात आणला. आरोपींवर कलम ५ (क) महाराष्ट्र पशु संवर्धन कायद्या १९७६  अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला.

मांस कोणत्या जनावराचे आहे याची शहानिशा करण्याकरिता डॉ देवकर यांना बोलावण्यात आले. मांस तपासणी करीता हैद्राबाद येथे पाठविण्यात येणार आहे. पुढील कार्यवाही व तपास ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश ताजने व मोहन कुडमेथे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.