उमरी येथे गोठ्याला आग, वासरू व साहित्य जळाले

गोठ्याला आग लावल्याचा शेतक-याचा संशय

बहुगुणी डेस्क, वणी: उमरी येथे शेतातील गोठा जळाला. बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत वासरू जळाले तर शेतक-याचे सुमारे 21 हजारांचे आर्थिक नुकसान झाले. ही आग लावण्यात आली असल्याचा संशय शेतक-याने व्यक्त केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार प्रवीण महादेव मोरे (36) हे उकणी पोस्ट सुकनेगाव ता. वणी येथील रहिवासी आहे. त्यांची गावालगतच असलेल्या शिरीगिरी शिवारात चाडे चार एकर शेती आहे. त्यांच्या शेतात बांबूचा गोठा आहे. या गोठ्यात एक वासरू होते. तसेच ते गोठ्यात शेतीपयोगी अवजारे, बि-बियाणे व इतर साहित्य ठेवतात. 1 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ते शेतात गेले असता त्यांना गोठा जळताना दिसला. त्यांनी पाण्याची मोटार लावून आग विझवली. मात्र तोपर्यंत गोठा पूर्णपणे बेचिराख झाला होता.

आगीत स्प्रिंकलर, प्लास्टिक पाईप, तुरीच्या बियाणांचा कट्टा, कुटार व वासरू जळाले. यात प्रवीण यांचे सुमारे 21 हजारांचे आर्थिक नुकसान झाले. त्यांनी या प्रकरणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा 325, 326(f) नुसार गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी प्रवीण यांचा एका शेतक-याशी पांदण रस्त्यावरून वाद आहे. घटनेचा तीन दिवसाआधी त्यांचा या शेतक-याशी वाद झाला होता. या वादातून गोठा जाळला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रात्री जेवणानंतर फिरायला गेलेल्या वृद्ध महिलेला कारची धडक

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

Comments are closed.