गौरी लंकेश यांच्या स्मृती दिनानिमित्त माकपचे वणीत आंदोलन

● विविध मागण्यांसाठी माकप आक्रमक

0

विवेक तोटेवार, वणी: 5 सप्टेंबर पत्रकार गौरी लंकेश यांच्या तिसऱ्या स्मृती दिनाचे औचित्य साधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज विविध विषयांवर वणीत आंदोलन करण्यात आले. निराधार व्यक्तींचे प्रश्न, वनाधिकार, खाजगीकरण, ऑनलाईन शिक्षण, नवीन शैक्षणिक धोरण इत्यादी विषयांवर टीका करत माकपने जोरदार निदर्शने केली.

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या धर्मांध मारेकऱ्यांकडून करण्यात आली. डॉ दाभोलकर, कॉ पानसरे, प्रा कलबुर्गी यांची सुद्धा हत्या त्याच प्रकारे करण्यात आली परंतु अजूनही मारेकरी व त्यांचे सूत्रधार पकडण्यात सरकारांना अपयश आले आहे. करिता ताबडतोब सरकारने मारेकऱ्यांना व त्यांच्या सुत्रधारांना अटक करावी.

निराधार लाभार्थ्यांना ताबडतोब रखडलेले मानधन द्यावे व उत्पन्नाच्या दाखला, हयात असल्याचे दाखले मागून त्यांची हेडसांड करू नये, आयकर न भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला पुढील सहा महिन्या पर्यंत ७५०० ₹ रोख मदत करावी.

शेतकरी विरोधी अध्यादेश मागे घ्या, लॉक डाउन काळातील संपुर्ण वीज बिल माफ करा, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजुरांना ५००० ₹ प्रति माह देण्याचा कायदा करावा.

शेतकऱ्यांच्या शेती मालाला स्वामिनाथन आयोगाचा शिफारशी प्रमाणे भाव जाहीर करा, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, शिक्षणाचे खाजगीकरण करणारे नवीन शिक्षण धोरण मागे घ्या.

ऑनलाईन शिक्षण पद्धती बंद करा, अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा,सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करणे बंद करा आदी मागण्यांना घेऊन तहसील कार्यालया समोर निदर्शने आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व कॉ शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके यांनी केले. या वेळेस प्रामुख्याने मनोज काळे, श्रीकांत सरमुकदम, कीर्तन कूळमेथे, संजय वालकोंडे, खुशालराव सोयाम, सुधाकर सोनटक्के, रामा आवारी,ऋषि कूळमेथे,संजय कोडापे,गजानन ताकसंडे इत्यादी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.