थोडक्यात महत्त्वाच्या क्राईम अपडेट

दारु पिण्यास पैसे नाही दिले म्हणून पत्नीला मारहाण... देवी दर्शन करुन घराकडे जाणाऱ्या व्यक्तीला अडवून शिवीगाळ... मोबाईल वर कॉल करून पाहून घेण्याची धमकी

दारु पिण्यास पैसे नाही दिले म्हणून पत्नीला मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून बायकोला थापडाणे मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नवऱ्या विरुद्द वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रवीण शंकर कोल्हे (30) रा.मैल गड्डा शास्त्रीनगर असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे.

फिर्यादी पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार दि.15 ऑक्टो. रोजी रात्री 8.30 वाजता ती स्वयंपाक करून घरात बसली होती. दरम्यान तिचा नवरा प्रवीण हा दारु पिऊन घरात आला व पुन्हा दारु पिण्यासाठी पैसे मागायला लागला. पत्नी हिने पैसे देण्यास नकार दिला असता नवऱ्याने थापडा मारल्या व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पत्नीने सरळ पोलीस स्टेशन गाठून पतीविरुद्द तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी पती विरोधात कलम 323, 504, 506 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

 

देवी दर्शन करुन घराकडे जाणाऱ्या व्यक्तीला अडवून शिवीगाळ
● रासा येथील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: गावात स्थापना केलेल्या सार्वजनिक दुर्गादेवीचे दर्शन करुन दुचाकीने घरी जात असलेल्या व्यक्तीला रस्त्यात अडवून शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी रासा येथील दोघांवर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्याधर कोटनाके (26) आणि जगदीश कोटनाके (24) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीची नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार रासा येथील मनोज परसराम बोढाळे (27) हा 15 ऑक्टोबर रोजी रात्री 7.45 वाजता दरम्यान देवीचे दर्शन करून आपल्या दुचाकीने परत घराकडे जात होता. दरम्यान रस्त्यातच गैरअर्जदार विद्याधर कोटनाके यांनी दारू पिऊन गाडी अडवली व वाद केला. तसेच त्याचे भाऊ जगदीश कोटनाके हा रात्री घराकडे येऊन शिवीगाळ केली व एखाद्या दिवशी पाहून घेईल अशी धमकी दिली.

फिर्यादी मनोज परसराम बोढाले यांची तक्रारवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

मोबाईल वर कॉल करून पाहून घेण्याची धमकी
अज्ञात इसमाविरुद्द गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: मोबाईल वर फोन करून पाहून घेण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी सुरेंद्र उर्फ मुन्ना नेमीचंद बोथरा, रा. प्रगती नगर वणी यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार दि.15 ऑक्टो. रोजी रात्री 7 वाजता दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने कॉल करुन ‘तुम लोगों को फंसा रहे क्या? असे म्हणून कॉल कट केला. तेव्हा फिर्यादी सुरेंद्र बोथरा यांनी आलेल्या 9019738016 या मोबाईल नंबरवर परत कॉल करुन तुम्ही कोण असे विचारले. परंतु समोरील इसमाने थेट शिवीगाळ करत हिंदी भाषेत ‘ तुमको तो मै देख लुंगा’ अशी धमकी दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्द कलम 507 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा:

चपलेने केला घात, घट विसर्जन करताना इसम गेला वाहून

देवीसमोर जगन्नाथ बाबांचे भजन का गात आहे म्हणत गायकाला मारहाण

Comments are closed.