पीककर्जासाठी ४ गावातील शेतकऱ्यांचे उपोषण
बँक व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर उपोषण तीन तासंत मागे
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील चार गावातील शेतकऱ्यांना पीककर्ज न मिळाल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी झरी येथील महाराष्ट्र बँकेच्या विरुद्ध एल्गार पुकारून उपोषणास सुरवात केली. मात्र उपोषणाचे हत्यार उपसताच बँक व्यवस्थापनाला जाग आली आणि त्यांच्या आश्वासनानंतर केवळ तीन तासांमध्येच उपोषण स्थगित करण्यात आले.
तालुक्यातील शेतकरी आधीच बोन्डअळी व इतर कारणाने कर्जात बुडाला असून शेती करून कुटुंबाचे पालन पोषण करणे कठीण झाले आहे. अशातच पांढरवाणी, शिबला, महादापूर, व भीमनाळा या गावातील शेतकरी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा झरी पोहचले. पीककर्ज मिळण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर असल्याची माहिती असल्याने वरील गावातील शेतकरी गेले परन्तु व्यवस्थापक यांच्या भावाचे निधन झाल्याने २३ सप्टेंबर पासून कामावर आले नाही.
कागदपत्र घेऊन गेलेल्या शेतकर्याना कागद पत्र घेण्यास नकार देऊन तुम्हाला काय करायचे ते करून घ्या अशी उर्मट भाषा वापरली. त्यामुळे संतप्त शेतकरी यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन १ सप्टेंबर पासून उपोषणला बसले. बँकेच्या चुकीने वरील गावातील शेतकरी कर्जपासून वंचीत राहिल्याने सदर बँकेविरुद्ध संताप व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे चारही गावातील शेतकऱ्यांनी याच बँकेतून कर्ज उचलले व इतर कोणत्याही बँकेचे कर्ज उचलून नाही व कोणत्याही बँकेशी जुडून नाही त्यामुळे वरील गावातील शेतकर्याना याच बँकेवर अवलंबून रहावे लागते.
या पूर्वी या बँकेविरुद्ध शेतकऱ्यांचे अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या असून बँकेच्या अश्या व्यवहारामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप आहे. त्वरित पीककर्ज देण्याची मागणी महादेव आत्राम, पैकू रामपुरे, बापूराव आत्राम, नामदेव आत्राम, लेतू दडांजे, रमाबाई दडांजे, लखमा मेश्राम, सूर्यभान आत्राम, भीमाबाई आत्राम, नाना मेश्राम, इंदूबाई सलामे, विलास टेकाम, जैत्राम आत्राम हे उपोषणाला बसले.
शेतकऱ्यांनी उपोषणास बसताच तीन तासात बँक व्यवस्थापकाकडून वरील गावातील वंचित शेतकर्याना कर्ज वाटप करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले त्यावेळी नायब तहसीलदार मत्ते सामाजिक कार्यकर्ते राम आईटवार व पाटणचे ठाणेदार शिवाजी लष्करे उपस्थित होते.