संजय लेडांगे, मुकुटबन: मुकूटबन परिसरात शनिवारी व रविवारी रात्री अचानक वादळी वा-यासह पाऊस आला. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे परिसरातील हजारो हेक्टर वरील कपाशीचे पीक जमिनदोस्त झाले आहे. तर सोयाबिन आणि तूर याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाती आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग चिंतातुर झाला आहे.
परिसरात शनिवार रात्री अचानक आलेल्या वादळी पावसाने मार्की, शेकापूर, पांढरकवडा (ल), मांगली, पवनार, अर्धवन आदी गावातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर वरील कपाशी पीक उद्ध्वस्त झाले आहे. सोयाबीन पिकांच्या शेंगांचीही बऱ्याच प्रमाणात झाडणी झाली. तर तुरीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गांचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
रविवारी देखील मोठ्या प्रमाणात वादळी वा-यासह पाऊस झाला. पावसाने दुस-या दिवशीही पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकरी सुलतानी संकटाचा सामना करीत असताना आता अस्मानी संकटही शेतक-यांवर ओढवले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)