सायकलीस्ट प्रणाली चिकाटे हिचे सोमवारी वणीत आगमण

पर्यावरणाचा संदेश घेऊन सुमारे 17 हजार किमीच्या सायकल भ्रमंतीची सांगता.... ठिकठिकाणी स्वागत व सत्काराचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पर्यावरणाचा संदेश घेऊन महाराष्ट्रभर सायकलने भ्रमंती करणारी सायकलीस्ट प्रणाली चिकाटे हिचे सोमवारी वणीत आगमण होणार आहे. तिच्या या कार्याबाबत परिसरात ठिकठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2020 पासून  प्रणाली सायकल भ्रमंतीवर आहे. प्रणालीने सुमारे 17 हजार किमीचा सायकलने प्रवास केला आहे. सोमवारी सकाळी 9 वाजता ती वणीत दाखल होणार आहे. त्याआधी स्माईल फाउंडेशनची टीम ही तिला घेण्यासाठी सायकलवारी करून मारेगाव येथे दाखल होणार आहे. तिथून या टीमसह ती वणीसाठी रवाना होणार आहे. दरम्यान शासकीय निवासी शाळा परसोडा येथे सकाळी 9:30 वाजता, बाजीराव वृद्धाश्रम चिखलगाव येथे स. 10:00 वाजता प्रणालीचा सत्कार करण्यात येणार आहे. तर महादेव नगरी येथे सकाळी 10.30 वाजता सुनील कातकडे यांच्या हस्ते प्रणालीचे स्वागत व सत्कार केला जाणार आहे. तर मंगळवारी वणीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रणाली ही तालुक्यातील पुनवट येथील रहिवाशी असून ती एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येते. तिचे वडील विठ्ठलराव चिकटे हे पुनवट येथे शेती करतात. प्रणालीचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर तिने 11 वी सायंससाठी चंद्रपूर येथे प्रवेश घेतला. 12 वी नंतर तिने सुशीलाबाई रामचंद्र मालेगाव, पडोली इथून सोशल वर्कची (बीएसडब्ल्यू) पदवी घेतली. 20 ऑक्टोबर 2020 रोजी तिने पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन पुनवटहून सायकल प्रवासाला सुरूवात केली होती. तब्ब्ल सव्वा वर्षानंतर तिच्या या प्रवासाची सांगता उदया होणार आहे.

मंगळवारी वणीत सायकल रॅलीचे आयोजन
मंगळवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी प्रणालीच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण वाचवण्याचा संदेश घेऊन वणीत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी  8:30 वा. महादेव नगरी चिखलगाव येथून या सायकल रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर वणीतील विविध भागातून ही सायकल रॅली मार्गक्रमण करणार आहे. वणी येथील पोलीस स्टेशन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून रॅलीची सांगता होणार आहे. या रॅलीला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्माईल फाउंडेशन, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, नगर सेवा समिती, युवा चेतना क्लब, नवरंग क्रीडा मंडळ, उड्डाण फिजिकल करियर अकॅडमी. नि:स्वार्थ सेवा 24 तास ग्रुप, जागरूक नागरिक मंच, एकच ध्येय हात माझा मदतीचा बहुउद्देशीय संस्था, ओबीसी महिला संघटन समन्वय समिती, गुरुदेव सेवा मंडळ, जन कल्याण बहुद्देशीय संस्था, विदर्भ राज्य आंदोलन समिती, बाजीराव वृद्धाश्रम चिखलगाव, अग्रेसर ग्रुप, TSO क्रीडा मंडळ, OBC(VJ NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती, प्रयास ग्रुप, जी.पी.टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन इत्यादी संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक परिश्रम घेत आहे.

हे देखील वाचा:

जेव्हा तिच्या सायकलीला अचानक बिबट्या क्रॉस करतो…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.