रेशनची डी 1 रजिस्टर व ऑनलाईन यादी संशयाच्या भोव-यात !

शासनाकडून मिळणाऱ्या मोफत तांदूळापासून अनेक कार्डधारक वंचित

0

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब व रोजमजुरी करून जगणा-या लोकांचे मोठे हाल होत आहे. तालुक्यातील बहुतांश गावातील शेकडो कुटुंबांना खासगी कंपनी, सामाजिक कार्यकर्ते, किराणा दुकानदार, संस्था, राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी यांनी किराणा व अन्नधान्य वाटप करून मोठी मदत केली. गरीब जनतेचे होणारे हाल पाहून शासनाने रेशन धारकांना रेशन दुकानातून प्रत्येक व्यक्तीला पाच किलो तांदूळ उपलब्ध करून दिले. तालुक्यातील सर्वच रेशन दुकानात हजारो क्विंटल तांदूळ उपलब्द्ध करून दिल्यानंतरही दुकानदारांनी कुपण धारकांना कुपन नसल्याचे कारण देऊन, कुपणात नाव नाही, ऑनलाइन नाव नोंदणी नाही असे कारण देऊन गोरगरीब जनतेच्या हक्काचे तांदूळ अनेक गरजू लोकांपर्यंत पोहचलेले नाही.

याबाबत माहिती घेतली असता रेशन दुकानदारांनी आपल्या जवळील डी १ रजिस्टर नुसार कार्ड धारकांना तांदूळ वाटप करने अनिवार्य आहे. कार्ड धारकांना ऑनलाइन नाव नसल्याचे सांगून शेकडो लोकांना शासनाचा मोफत मिळणाऱ्या तांदुळपासून वंचित राहावे लागले आहे. शासनाचा माल डी १ रजिस्टर नुसार आणला जातो, मग ऑनलाइन नुसार वाटप का करण्यात आले. याचा अर्थ डी १ रजिस्टर मध्ये कुपन धारकांच्या कुटुंबियांचे सर्व नाव आहे व ऑनलाइन नोंदणी मध्ये धारकांचे मध्ये कमी नावे असल्याचे स्पष्ट होत आहे.

रेशनच्या धान्याची खासगी विक्री ?

धान्याची उचल जास्त करून कमी लोकांना धान्य वाटप करण्याचा गोरखधंदा तालुक्यात सुरू असल्याचे चित्र लॉकडाऊन मध्ये उघड झाली आहे. तालुक्यातील कुंडी येथील रेशन दुकानदार प्रामाणिक असून त्यांनी पूर्ण माल वाटप करून रेकोर्ड क्लीयर असल्याची माहिती आहे. लॉकडाऊन दरम्यान रेशन दुकानदारांना कमी किमतीत आलेल्या गहू व तांदूळ गरिबांना वाटप करीत असल्याची दाखवून अनेक दुकानदारांनी खासगी लोकांना १८०० ते २००० हजार रुपये क्विंटल प्रमाणे विकल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे.

तालुक्यातील रेशन दुकानदारा बाबत अनेक तक्रारी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, एसडीएम, तहसीलदार यांना करण्यात आल्या परंतु एकाही दुकांदारावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. उलट रेशन दुकान वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. महसूल विभाग व रेशन दुकानदार यांचे ‘मधुर’ सबंध असल्याने कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याची ओरड आहे.

शिबला येथील दुकानाला अभय का?
शिबला येथील रेषन दुकानदाराने दोन कुपन धारकाच्या कुपणवरील स्वतःचा अंगठा (थम) लावून मार्च व एप्रिल २०२० या दोन महिन्याचे धान्य उचल केल्याचे तक्रारकर्त्यांनी सिद्ध करून दिल्यानंतरही रेशन दुकांदारावर अजूनही कार्यवाही केली नाही. ज्यामुळे महसूल विभागावर संशयाची सुई फिरत आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हापूरवठा अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन डी १ रजिस्टj व ऑनलाइन केलेली नोंद यात मोठा घोळ असल्याचे कार्डधारकाकडून ओरड होत आहे व संशय बळावला आहे तरी ऑनलाइन नोंदणी व डी १ रजिस्टर मधील नावाची नोंद तपासून दोषी दुकांदारावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.