दादासाहेब कन्नमवार पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

विविध कार्यक्रमाद्वारे वाहिली आदरांजली

0

विवेक तोटेवार, वणी: वणी येथे बेलदार समाजाचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान असलेले लोकनेते कर्मविर स्व.मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेणअयात आला. हा कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला.

प्रथम सत्रात सकाळी 8:30 वाजता कर्मवीर दादासाहेब कन्नमवार चौक येथे त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बेलदार समाज बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, युवा बेलदार समाज वणी शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि वणी, नागपूर, चंद्रपूर येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुस-या सत्रात श्रीराम मंदिर वणी येथे दुपारी 12 ते 3 या वेळात स्व. मा. सा. कन्नमवार प्रचार प्रसार मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाजीरावजी बूग्गेवार, प्रमुख पाहुणे म्हणून संघर्ष वाहिनीचे तसेच स्व.कन्नमवार प्रचार व प्रसार समितीचे दिनानाथजी वाघमारे, मुकुंदजी अडेवार, विनोद आकूलवार, आनंद अंगलवार, प्रभाताई चिलके, सुशगंगा पॉलटेक्नीक कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपभाऊ बोनगीरवार, युवा बेलदार समाज संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष हनमंतू रजनलवार, झरी पं.स. सदस्य राजूभाऊ गोंड्रावार, वणी न.प. सदस्य राकेश बूग्गेवार, डॉ. प्रीती तोटावार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी त्र्यंबकराव तोटावार, बेलदार समाज बहुउद्देशीय संस्थेचे सचिव मा.पांडुरंगजी ताटेवार आदी उपस्थित होते.

मुकुंदजी अडेवार यांनी आपल्या भाषणातून कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती यावर्षी पासून सर्व शासकीय व निमशासकीय स्तरावर साजरी केली जाणार असा शासन आदेश येत्या 13 डिसेंबर पर्यंत येईल, अशी माहिती दिली. यावेळी समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उमाकांत जामलीवार प्रास्ताविक ताटेवार सर आणि आभार राकेश बरशेट्टीवार यांनी केले.

कार्यक्रमेच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर बोनगीरवार, गजानन चंदावार,अमोल मसेवार, विजय कावटवार, अशोक ठाकूरवार, शैलेश बुग्गेवार, प्रवीण येलपूलवार, विशाल बोरकुटवार, विनोद महाजनवार श्रीनिवास येडलावार, अमोल बुग्गेवार, सुनील बोनगीरवार, राजुभाऊ बरसेट्टीवार, संदीप मूत्यलवार, निखिल बेझलवार, आतिश बुरेवार, सागर बरशेट्टीवार आदींनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.