आज मुकुटबनमध्ये संविधान दिना निमित्त जाहीर व्याख्यान

आज दणाणेल ऍड वैशाली डोळस यांची तोफ

0

सुशील ओझा, झरी: 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त व बिरसा मुंडा जयंती निमित्त मुकुटबन येथे सोमवारी 26 नोव्हेंबर 2018 ला व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 6 वाजता नामवंत व्याख्याती ऍड वैशाली डोळस यांचे व्याख्यान होणार आहे. भारतीय बौध्द महासभा व संभाजी ब्रिगेड तालुका झरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम मुकुटबन येथील आदर्श शाळेच्या पटांगणावर रंगणार आहे. यात प्रमुख व्यक्त्या व सामाजिक कार्यकर्त्या ऍड वैशाली डोळस या ”संविधान व आजची परिस्थिती” या विषयावर जाहीर व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष रवी भगत असणार आहे. तर उद्घाटन म्हणून ग्रामपंचायत सरपंच शंकर लाकडे राहणार आहे.

कार्यक्रमाबाबत माहिती देताना आयोजक देव येवले म्हणाले की…

भारतीय संविधान म्हणजे कल्याणकारी राज्याचा जाहीरनामा आहे. संविधानाच्या माध्यमातून आपण लोकशाही मुल्यांवर आधारीत नवा भारत निर्माण करण्याचा निश्चय केला आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान राष्ट्राला अर्पण केले. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून देशभरात साजरा केला जातो. या निमित्ताने संविधानाचे महत्त्व आणि संविधानासमोरील आव्हाने याचे चिंतन करण्यासाठी संभाजी ब्रिगेड व भारतीय बौद्ध महासभेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी गवई गट विकास अधिकारी, धनंजय जगदाडे पो निरीक्षक, अजय धोबे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, दीपक बरशेट्टिवार, कपिल श्रुंगारे, भगवान इंगळे, अजय जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.