शनिवारी वणीत शासकीय कर्मचा-यांचा डफडे बजाव मोर्चा
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी आक्रमक
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी 17 ऑगस्ट रोजी शासकीय कर्मचा-यांचा डफडे बजाव मोर्चा निघणार आहे. दु. 12 वाजता छ. शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा राहणार आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वणी, मारेगाव व झरीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे.
मागील अनेक वर्षांपासून १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी संघटनेच्यावतीने आंदोलनाद्वारे वारंवार केली जात आहे. मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात २८ डिसेंबरला दीड लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत पेन्शन संकल्प यात्रेत सहभागी होऊन शासनाच्या नकारात्मक धोरणाचा निषेध नोंदवला होता.
त्यानंतर मार्च २०२३ मध्ये राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारून योजना लागू करण्याची मागणी केली होती. त्यावेळी समितीः स्थापन करून तीन महिन्यांत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही.डीसीपीएस, एनपीएस आणि आता जीपीएससारख्या फसव्या, योजना कर्मचाऱ्यांवर न लादता राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, या मागणीसाठी वणीत हे आंदोलन करण्यात येणार आहे.
यात सहभागी – होण्याचे आवाहन राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष रवी चांदणे, सचिव विलास टोंगे, कार्याध्यक्ष हनुमंत गिरीगोसावी, कोषाध्यक्ष श्रीराम वाघमारे, सल्लागार उमेश व्यास, सरचिटणीस देवेंद्र खरवडे यांनी केले.
Comments are closed.