गिरीश कुबडे, अमरावतीः हेमंत नृत्य कला मंदिराचे संस्थापक दिवंगत पं. नरसिंगजी बोडे यांच्या 90 व्या जन्मदिवसानिमित्त 4 मे रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत स्थानिक मनपा टाऊन हॉलमध्ये सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल. यात नृत्य, गायन व वादन अशा कलांचे सादरीकरण विद्यार्थी करतील. विदर्भातील ख्यातनाम निवेदक व लेखक कवी सुनील इंदुवामन ठाकरे या मैफलीचे निवेदन करतील. नृत्य संगीत कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र बोडे यांचे मोलाचे योगदान राहील.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती ज्येष्ठ कथ्थक गुरू पं. दत्तराज बोडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन बोडे, पं. रमेश बोडे यांनी केली आहे. आयोजनाची व्यवस्था योगेश बोडे, राजेश बोडे, शैलेंद्र बोडे, जगदीश बोडे, संस्थेचे शिक्षकवर्ग व विद्यार्थी सांभाळत आहेत.