दारूबंदीसाठी नवरगावात तणावाच्या वातावरणात मतदान

महिलांची जोरदार घोषणाबाजी, काय लागला निकाल?

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिला शक्ती एकवटली. त्याबाबत ३० सप्टेंबरला नवरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आडव्या बाटलीसाठी मतदान घेण्यात आले. ६२५ मतदारांपैकी ४१९ महिलांनी यात मतदान केले. सकाळी 8 ते 5 दरम्यान मतदान झाले. जेव्हा मतमोजणीची वेळ आली तेव्हा गावातील सर्व महिला जिल्हा परिषद शाळेच्या आवारात धडकल्या मात्र मतमोजणी काही झालीच नाही.

नवरगाव येथील महिलांनी सयुंक्तरित्या राज्य उत्पादन शुल्क पांढरकवड़ा यांना दारूबंदीबाबत निवेदन सादर केले होते. त्यात २५ टक्के महिला मतदारांच्या सहया असल्याने महिला शक्तिच्या निवेदनाची दखल घेण्यात आली. जिल्हा अधिकारी यवतमाल यांनी ३० सप्टेंबरला नवरगाव येथील देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी महिलाचे गुप्त मतदान घेण्यात आले.

मतमोजणीची वेळ आली तेव्हा परवाना धारकाने उच्च न्यायालयातुन यावर स्थगिती आणली. याची माहिती मिळताच महिला संतप्त झाल्या. त्यांनी स्थगितेची माहिती का दिली नाही असा जाब विचारला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. संबंधीत प्रशासकीय अधिका-यांवर कार्यवाही करा अशी मागणी यावेळी महिलांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.