झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

गोंडबुरांडा येथील तलाव परिसरातली घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील गोंडबुरांडा हद्दीत तलाव परिसरात झाडाला लटकलेला मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सोमवारी आढळला. गोंडबुरांडा येथील जिल्हा परिषद शिक्षक राजकुमार संतोष बोंदरे (52) असे मृतकाचे नाव आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही हत्या की आत्महत्या या चर्चेला परिसरात पेव फुटला आहे.

Podar School 2025

मृतक राजकुमार संतोष बोंदरे हे पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते पांढरकवडा येथे राहायचे ते रविवारपासून घरुन बेपत्ता होते. त्यांचा मोबाईलदेखील बंद होता, कुटुंबातील मंडळी रविवारपासून त्यांचा शोध घेत होते; पण त्यांचा शोध लागत नव्हता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सोमवारी 21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान गोंडबूरांडा ते नरसाळा दरम्यान तलावाजवळ एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृतकाच्या शरीरावर जखमा होत्या. कपडे रक्ताने माखले होते. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या या चर्चेला पेव फुटले आहे. वृत्त लिहिपर्णत पोलिस घटनास्थळी पोचलेत. पंचनाम्याची प्रक्रिया सुरु होती.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.