नाल्यात ग्रामसेवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

घटनास्थळी वाहन आढळून न आल्याने घातपाताची शक्यता

0

विवेक तोटेवार, वणी: आज बुधवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी वरोरा येथील रहिवासी असलेले व मारेगाव तालुक्यातील आपटी दांडगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाचा वणी कायर रोडवर असलेल्या एका नाल्यात मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Podar School 2025

बुधवार 3 फेब्रुवारी रोजी वणी-कायर रोडवरील वनकर यांच्या शेताजवळील नाल्यात एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला आढळला. लोकांनी याची माहिती वणी पोलिसांना दिली. घटनास्थळी त्वरित ठाणेदार वैभव जाधव, माया चाटसे, विठ्ठल बुरेवर व पोलीस कर्मचारी पोहचले होते. मृत इसमाच्या खिशात आढळलेल्या कागदावरून मृतकाची ओळख पटली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मृतकाचे नाव सुहास बापूजी झाडे (49) रा. शिवाजी वार्ड, वरोरा येथील रहिवासी होता. सुहास हे मारेगाव तालुक्यातील आपटी दांडगाव येथे ग्रामसेवक होते. ते मंगळवारी रात्री पासून घरी आले नव्हते. याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी फोनवर माहिती घेतली. परंतु सुहासचा पत्ता लागला नाही. मात्र आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.

घटनास्थळी त्यांचे वाहन आढळून आलेले नाही. त्यामुळे घातपात झाल्याची शक्यता वर्तविला जात आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर याबाबत माहिती मिळणार आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

कॉलेजला जातो म्हणून घरून निघाली, आणि घरीच नाही परतली

चिखलगाव येथे दारू तस्करी करताना पोलिसांची धाड

Leave A Reply

Your email address will not be published.