विवेक तोटेवार, वणी: ब्राह्मणी फाट्याजवळ शिव मंदिरामागे सोमवारी दुपारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही. ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात जमादार राजू देठे प्रकरणाचा तपास करीत आहे. इसमाचा गळा आवळल्याचा प्राथमिक अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. मृत्यूचे कारण आत्महत्या, हत्या की अन्य काही, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.


Comments are closed.