विवेक तोटेवार, वणी: घरच्या टाक्यातून मोटरद्वारे पाणी काढत असतांना अचानक करंट लागल्याने एकाचा इसमाचा मृत्यू झाला. आज मंगळवारी दिनांक 11 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास वरद अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. डंम्बर साउद असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृतक डंम्बर साउद हे मूळचे नेपाळ येथील रहिवासी होते. ते गुरखा म्हणून काम करून उदरनिर्वाह करायचे. ते आज दुपारच्या सुमारास दुपारी घरातील टाक्यातील पाणी मोटरद्वारे काढत होते. दरम्यान पाऊस सुरू असल्याने मोटरमध्ये करंट आला. करंट बसताच ते खाली कोसळले. त्यांच्या पत्नी व शेजाऱ्यांनी त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर ही महिती त्यांचा भाचा चक्र धनराज साउद (40) याला मिळाली. चक्र यांनी जाऊन बघितले असता डॉ त्यांना मृत घोषित केले होते. चक्र यांच्या तक्रारीवरून मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.