अखेर मृत्यूशी झुंज संपली, वनोजादेवी येथील घटना

5 सप्टेंबर रोजी केला होता विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील वनोजादेवी येथील एका 43 वर्षीय इसमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर पाच दिवसानतंर या इसमाचा चंद्रपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. मृतक हा एका खून प्रकरणातील आरोपी सुद्धा असल्याची माहिती आहे. मृतक हा एका बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपी सुद्धा असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहिती नुसार मृतक सुरेंद्र घाटे (43) रा. वनोजादेवी हा वडिलांचे नावे असलेली तीन एकर जमिनीवर शेती करायचा. 5 सप्टेंबर रोजी घरी कुणी नसताना त्यांनी विषारी औषध प्राशन केले. दरम्यान ही बाब कुटुंबियांच्या व शेजा-यांच्या लक्षात आली. सुरेंद्रला तात्काळ वणी येथील रुग्णालयात भरती केले होते.

प्रकृती चिंताजनक असल्याने सुरेंद्रला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते. मात्र अखेर बुधवारी 9 सप्टेंबर रोजी उपचार दरम्यान सुरेंद्रची प्राणज्योत मालवली.

मृतक बहुचर्चित वनोजा हत्याकांड प्रकरणातील आरोपी
वनोजादेवी येथील शुभम अनिल झाडे या युवकाचा 16 एप्रिल 2019 रोजी खून झाला होता. बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाचा वनोजादेवी जवळील गोरज फाट्याजवळ मृतदेह आढळून आला होता. या खून प्रेम प्रकरणातून झाल्याचा समोर आले होते. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतक सुरेंद्र घाटे यांच्यावर या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप होता.

मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, बहिण भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. मृतकाचे आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.