जेष्ठ पत्रकार भूषण शर्मा यांचे निधन

शुक्रवारी मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील जेष्ठ पत्रकार भूषण दिवानचंद शर्मा (70) यांचे गुरुवार 19 मे रोजी निधन झाले. वणी येथून प्रकाशित होणारे साप्ताहिक मुक्त ललकार या साप्ताहिकाचे ते संपादक होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर नव्हती. ते कुणालाही न सांगता परिसरातील मंदिरात देवदर्शनाला जात होते. आज देखील ते असेच निघून गेले होते. मात्र आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास उमरी जवळील विठ्ठल मंदिर परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. अतिशय खडतड काळात त्यांनी मुक्त ललकार हे साप्ताहिक काढून व ते यशस्वीरित्या चालवून परिसरातील पत्रकारिता जिवंत ठेवण्यास त्यांनी मोठा हातभार लावला. त्यांच्या निधनाची वार्ता शहरात पोहोचताच पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे. शुक्रवारी दिनांक 20 मे रोजी वणी येथील मोक्षधाम मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे एक मुलगी व भाऊ प्रवीण शर्मा आहे. वणी बहुगुणी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!