जितेंद्र कोठारी, वणी : मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचारच्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मारेगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचे नेतृत्वात मार्डी चौक ते तहसील कार्यालय पर्यंत आयोजित निषेध मोर्च्यात शेकडो महिला पुरुष कार्यकर्ता बॅनर व पाट्या घेऊन सहभागी झाले.
पीडित चिमुकली व तिच्या कुटुंबियांना लवकर न्याय मिळणे करीता सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. पीडितेतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती शासनाने करावी व नराधम आरोपीला कठोर शिक्षा व्हावी.अशी मागणीचे निवेदन यावेळी तहसीलदार दीपक पुंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार याना देण्यात आले.

निषेध मोर्च्यात मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, नगरसेविका अंजुम शेख, संगीता सोनुले, आरती राठौड़, प्रिया लभाने सिंधुताई बेसकर , सुशीला बोढाले, धनंजय त्रिम्बके, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर, विलन बोदाडकर, वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे, चांद बहादे, माया पारखी, मंदा पारखी, वैशाली तायडे, कोळगाव ग्रा. प. सरपंच अभिलाशा निमसटकर व शेकडो कार्यकर्ते शामिल होते.
अनेक संघटनांनी नोंदविले निषेध
पहापळ घटनेच्या विरोधात मारेगाव व वणी तालुक्यातील अनेक सामाजिक, राजनैतिक व महिला संघटना यांनी तीव्र निषेध नोंदविले आहे. माणुसकीला काळिमा फासणारी या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध करून आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे. सिवाय या घटनेमुळे सर्वसाधारण नागरिकांच्या मनात रोष उत्पन्न झाल्याचे दिसून येत आहे.
