विवेक तोटेवार, वणी: वणीतील रहिवाशी असलेल्या रौनक कोठारी यांना नुकतेच फिजिओथेरपिस्ट पदवी बहाल करण्यात आली. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे शुक्रवार 27 मे रोजी आयोजित पदवीग्रहण समारंभात रौनक कोठारी यांना बॅचलर ऑफ फिजिओथेरफिस्ट या पदवीने गौरविण्यात आले. रौनक हे पत्रकार जितेंद्र कोठारी यांचा मुलगा आहे.
रौनकने वणी येथील स्वर्णलीला इंटरनेशनल शाळेत 12 वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर नीट परीक्षा उत्तीर्ण केली. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या कॉलेज मध्ये 4 वर्षाचे अभ्यासक्रम व 6 महिन्याचे इंटर्नशिप कोर्स पूर्ण झाल्यावर त्यांना BPTH डिग्री मिळाली आहे.
डॉ. रौनक कोठारी आपले यशाचे श्रेय आपले आई, वडील, बहीण, परिजन, स्वर्णलीला शाळेचे प्रिन्सिपल व शिक्षक तसेच डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी जळगाव येथील शिक्षकांना दिले आहे.
Comments are closed.