निराधारांचे थकीत अनुदान दिवाळीपूर्वी देण्याची मागणी

वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

जितेंद्र कोठारी,वणी: तालुक्यातील निराधार, वृद्धपकाळ, दिव्यांग व विधवा पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान दिवाळीपूर्वी देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याबाबत गुरुवार 21 ऑक्टो.रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

वणी तालुक्यात तब्बल 8 हजार निराधार, वयोवृद्ध, विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान मागील काही महिन्यापासून प्रलंबित आहे. दिवाळीपूर्वी अनुदान मिळणेकरिता शेकडो लाभार्थी दररोज तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहे. मात्र शासनाकडून अजून पैसे आले नाही, असे उत्तर त्यांना रोज मिळत आहे. अनेक निराधार व वृद्द व्यक्ती शासनाकडून मिळालेल्या अनुदानाच्या भरवश्यावरच आपले उदरनिर्वाह करीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ निर्माण होत आहे.

दिवाळी सारखा प्रमुख सण काही दिवसांनी आला असून त्यांचा समोर सण कसा साजरा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर निधीची तरतूद करून तालुक्यातील निराधार, वयोवृद्ध, दिव्यांग व विधवा पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वळती करावी. अश्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हाअध्यक्ष मंगल तेलंग, शहराध्यक्ष किशोर मुन यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.

दिवाळीपूर्वी सर्वांना अनुदान मिळणार – ना. तहसीलदार
तालुक्यातील निराधार, दिव्यांग, वृद्धपकाळ व विधवा पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर 2021 पर्यंतचे मानधन वाटप करण्यात आले आहे. काही योजनेतील लाभार्थ्यांना जुलैपर्यंत मानधन मिळाले आहे. कोरोना काळात शासनाकडे निधीची कमतरता असल्यामुळे अनुदान रखडले आहे. मात्र दिवाळीपूर्वी प्रलंबित मानधन मिळणार आहे.
– रामचंद्र खिरेकर, नायब तहसीलदार, वणी

हे देखील वाचा:

वणीत जश्न ए ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरा

मटका धाड प्रकरणी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Comments are closed.