दामले नगर येथे नवीन नळ पाईपलाईन टाकण्याची मागणी
दी ग्रेट पिपल्स गृपच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन
विवेक तोटेवार, वणी: शहरातील दामले नगर येथे नळाच्या पाण्याची पाईप लाईन नसल्यामुळे येथील रहिवाशांचे पाण्यासाठी हाल होत आहे. दामले नगर येथे पाईपलाईन ही सुमारे 15 वर्षांपूर्वी टाकलेली आहे. ती पाईपलाईन आता जिर्ण होऊन फुटली आहे. त्यामुळे या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे वार्डात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाणीच येत नसल्याने अनेक लोक पाणी विकत घेऊन आपली गरज भागवत आहेत. तर नळाची पाईप लाईन नसल्यामुळे नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठीही अडचण येत आहे. याबाबत द ग्रेट पिपल्स गृपच्या वतीने दिनेश रायपूरे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देत नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी केली आहे.
Comments are closed.