लालगुडा-भालर परिसरासाठी स्वतंत्र फिडरची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या एका वर्षभरापासून लालगुडा व भालर परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून ग्रामीण भागाला त्याचा चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी सहाय्यक अभियंता म. रा. वि. वि. कं. मर्या. वणी (ग्रामीण) यांना निवेदनाद्वारे स्वतंत्र फिडरची मागणी केली.

लालगुडा सब स्टेशन मधून निघणाऱ्या 11 केव्हीच्या मारेगाव फिडरवर निळापूर, ब्राम्हणी पासून तर तरोडा या गावांपर्यंत असा एकूण 15 गावांचा विद्युत पुरवठा चालतो. तसेच या फिडर ची लांबी जवळपास 85 कि.मी. असून त्यामुळे या फिडर वर जास्त ताण पडतो. फिडर वारंवार ट्रिप होत आहेत. फिडर वरील कोणत्याही एका गावात लाईन चा प्रॉब्लेम निघाला तरी इतर 14 गावांना रात्र – रात्र अंधारात काढावी लागते.

या फिडर वरील ताण कमी करण्यासाठी व परिसराती विद्युत पुरवठा सुरळीत चालण्यासाठी लालगुडा सब स्टेशन मधून 11 केव्ही ची नवीन वाहिनी काढून ती धोपटाळा फाट्याजवळ घ्यावी व धोपटाळा, भालर, बेसा, लाठी, निवली, तरोडा या गावांसाठी स्वतंत्र फिडर उपलब्ध करून द्यावे अशी चर्चा निवेदन देताना मनोज ढेंगळे यांनी सहाय्यक अभियंता व उप कार्यकारी अभियंता यांचे सोबत केली.

यावेळी लालगुडा, भालर, बेसा, लाठी, निवली गावांचे सरपंच व गावकऱ्यांच्या सह्या असून निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ता मनोज ढेंगळे यांच्या सोबत महेश पाटिल, भवसागर पेटकर, राहूल खोंडे, शुभम खिरटकर, पुंडलिक खोके, सतिश देवतळे, गजानन गोहोकार, अनंता उपरे, अभिषेक काकडे, प्रफुल गोहोकार, गणेश माहूरे, तुळशीराम खोके, निलेश डोहे, भोला पारटकर, किशोर निखाडे, संतोष भोंगळे, रामकृष्ण ताजणे इ. गावकरी उपस्थित होते.

Comments are closed.