शहरात दोन ठिकाणी मटका अड्ड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एकता नगर व नगर परिषद शाळा क्र. 3 जवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार 1 सप्टे. व शनिवार 2 सप्टे रोजी करण्यात आली. अब्दुल रउफ शेख इब्राहीम रा. मोमिनपुरा वणी व प्रफुल्ल श्रावण अलोणे रा. पंचशील नगर वणी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दोन्ही ठिकाणाहून 6 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार ठाणेदार अजित जाधव हे पोलीस कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंगवर असताना त्यांना एकता नगर जवळ मटका सुरु असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून त्यांनी एकता नगर जवळ धाड टाकली असता एक इसम वरली मटक्याचे आकडे लिहिलेली चिठ्ठ्या फाडत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या जवळून नगदी 1 हजार 50 रुपयासह पट्टीबुक, कार्बन, पेन इत्यादी जप्त केले.

तसेच गोपनीय खबरी कडून मिळालेल्या माहिती वरून स्था. गु. शाखा पथकाने येथील नगर परिषद शाळा क्र. 3 चे बाजूला सार्वजनिक जागेवर सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकून प्रफुल्ल श्रावण अलोणे रा. पंचशील नगर वणी या इसमाला ताब्यात घेतले. आरोपीकडून पोलिसांनी 5 हजार 610 रुपये रोखसह वरली मटका साहित्य जप्त केले. पो. का. सुनील नलगंटीवार व पो.ना. भोजराज करपते यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजीत जाधव, स्था. गु. शाखा प्रमुख सपोनि अतुल मोहनकर, सुनील नलगंटीवार, सुनील खंडागळे. सुधीर पांडे, निलेश निमकर, रजनीकांत मडावी यांनी केली.

Comments are closed.