झरी पंचायत समिती अंतर्गत विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी

सभापती राजेश्वर गोंड्रावार यांचे निवेदन

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुका निर्मिती होऊन अनेक वर्षे झाली आहे. झरी येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय,भूमी अभिलेख कार्यालय, न्यायालय, ट्रेझरी, बँक, कॉलेज, शाळा, नगरपंचायत, शासकीय रुग्णालय, एकात्मिक बाल विकास कार्यालय व इतर अनेक कार्यालय असून बहुतांश कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे पद रिक्त पदे असल्यामुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे.

पंचायत समिती अंतर्गत पंचायत विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व अंगणवाडी विभाग असून या विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहे. अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायत पेसा मध्ये येत असल्याने तसेच आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात कामे व्हावे याकरिता बदली झालेल्या अधिकारी व कर्मचारी पेक्षा जास्त म्हणजे १०० टक्के रिक्त झालेले पदे भरण्यात यायला पाहिजे होते.

परंतु आदिवासी बहुल झरी तालुका असून सर्वप्रथम सर्व विभागातील १०० टक्के रिक्त पदे भरणे आवश्यक असतांना त्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या हा झरी तालुक्यावर अन्याय असल्याचे सभापती गोंड्रावार यांनी निवेदनातून म्हटले आहे.

तालुक्याचा विकास खुंटला असतांना तसेच मानव विकास निर्देशांक कमी असताना तालुक्याकरिता अधिकारी व कर्मचारी न देणे म्हणजे तालुक्याचे दुर्भाग्य असून तालुक्याला विकासापासून कोसो दूर ठेवण्यात येत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

सभापती गोंड्रावार यांनी जीबी मध्ये पंचायत समितीअंतर्गत सर्व विभागामध्ये सक्षम कर्मचारी देण्याबद्दल ठराव सुद्धा केला होता तरी सुद्धा १०० टक्के कर्मचारीचा भरणा केला नाही व याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे सुद्धा तक्रातीतून केला आहे. तरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्यातील पंचायत समिती स्तरावरील सर्व पदे भरण्यात यावे अशी मागणी झरी पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी केली आहे.

विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद सदस्य यांनी प्रयत्न करून वरील अनेक भरणे आवश्यक असतांना हे काम सभापती करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.