सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ आत्राम यांचे निधन

'दीनां'च्या मदतीचा हात अचानक हरवला

बहुगुणी डेस्क, वणीः नगर परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ आत्राम (71) यांची बुधवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता प्रणज्योत मालवली. तहसील कार्यालयात सेवा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. नंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं.

अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा हिरीरिने सहभाग असायचा. तहसील कार्यालयात येणाऱ्या अडल्या-नडल्यांना ते तांत्रिक मदत करीत. मितभाषी आणि व्यापक जनसंग्रह ही त्यांची खासियत होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

Comments are closed.