‘अँबुलन्स सेवक’ म्हणून विख्यात सतीश गेडाम यांचे निधन
काही दिवसापासून होते आजारी, गणेशपूर येथे झालेत अंत्यसंस्कार
बहुगुणी डेस्क, वणी: येथील राजे अँबुलन्स सर्व्हिसचे संचालक सतीश बाबुलालजी गेडाम यांचे शनिवार दिनांक १५ ला पहाटेच्या दर:म्यान आजाराने निधन झाले. त्यांनी ८ वाजताच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. सतीश गेडाम हे काही दिवसांपासून आजारी होते. मात्र १५ तारखेला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गणेशपूर येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार झालेत. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.