मांगली येथील सरपंचांनी पकडली १५ पेटी देशी दारू

चार चाकीसह दोन्ही आरोपी फरार

0
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथे परवाना धारक देशी दारुचे दुकान असून या दुकानातून आलिशान चारचाकीने देशी दारूची वाहतूक होत असल्याची कुणकुण सरपंच नितीन गोरे यांना काही दिवसांपूर्वी लागली होती. १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान सरपंच गोरे हे नानाजी बद्रे यांना घेऊन झरी जात असताना गावाजवळील रेल्वे गेट जवळ चारचाकी क्रमांक एम एच ३४ एए ९६९१ आली असता सदर गाडीत देशी दारूच्या पेट्या असतील अशी शंका आल्याने चारचाकी थांबवली व पाहणी केली असता सदर गाडीत रुपेश कंपनीच्या बैच नं ८८ देशी दारूच्या १५ पेट्या म्हणजे ६७५ शिष्या १८० मिली च्या आढळून आल्या.
गाडीतील दारूच्या पेट्या तपासणी करिता खाली उतरविला व चारचाकी बाजूला लावण्यास सरपंच यांनी सांगितले असता चारचाकी मालक नरेश ताडपेलीवार व ड्रायवर गाडी घेऊन पसार झाले. १५ पेटी दारू पकडल्याची माहिती मुकूटबन पोलीस स्टेशन ला देण्यात आली. यावरून ए एस आय शशिकांत नागरगोजे घटनास्थळी पोहचले व सरपंच यांच्या चारचाकी मध्ये दारूच्या पेट्या भरून पोलीस स्टेशन ला आणण्यात आले.
सरपंच यांनी पोलीस व अबकारी विभागांना तक्रार केल्या यांच्या तक्रारीवरून गाडीमालक नरेश ताडपेल्लीवार व ड्रायवर यांच्याविरुद्ध कलम ६५ ए व ६५ ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अबकारी विभागाचे निरीक्षक केडीया आपल्या कर्मचऱ्यासह ठाणे गाठून चोकशी केली व दारू पेटीचे बैच नं व पोलीस कार्यवाहीचे कागदपत्रे घेतले व सदर दारू दुकानावर कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. पुढील तपास ठाणेदार धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत नागरगोजे करीत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.