कैलाशनगर येथील देशी दारु दुकानाला ठोकले सील

तस्करांना अवैधरित्या दारू सप्लाय करणे भोवले

0

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कैलाशनगर येथील परवानाधारक देशी दारू दुकानातून चंद्रपूर जिल्ह्यात दारु पुरवठा होत असल्याच्या कारणावरून सदर परवानाधारक दुकानाला सील ठोकण्यात आल्याची माहिती आहे. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पाद शुल्क विभागाने शुक्रवारी रात्री 9 वाजता दरम्यान संयुक कारवाई करून दुकान सील केले.

दारूबंदी असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील नारंडा येथे गुरुवारी 200 पेटी देशी दारु चंद्रपूर पोलिसांनी पकडली. पकडण्यात आलेल्या दारूच्या पेट्या वणी तालुक्यातील कैलाशनगर येथील मंदाताई कळसे यांच्या नावाने परवाना असलेल्या दुकानातुन पुरवठा करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. चंद्रपूर येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक यांना माहिती दिली.

 पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून यवतमाळ जिल्हा आबकारी अधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्हातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवार 5 फेब्रुवारीच्या रात्री 9 वाजता सुमारास कारवाई करून कैलाशनगर येथील देशी दारु दुकानाला सील ठोकले. दारूबंदी नंतरही चंद्रपूर सीमेलगत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात देशी दारूची तस्करी सर्रास सुरू आहे. मात्र अबकारी विभागाच्या या कारवाईमुळे अवैधरित्या देशी विदेशी दारू पुरवठा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.