संतप्त शिवसैनिकांचा दुकानावर हल्लाबोल

आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-या व्यक्तींच्या दुकानाची नासधूस

0

विवेक तोटेवार, वणी: फेसबूकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणाचे आज वणीत तीव्र प्रतिसाद उमटले. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज मंगळवारी दिनांक 26 मे रोजी सकाळी आक्रमक होत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणा-या व्यक्तींच्या व्यावसायिक प्रतिष्ठाणावर विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात हल्लाबोल केला. या हल्लात दुकानाचे लाखोंचे नुकसान झाले आहेत.

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी काल सोमवारी वणी पोलीस ठाण्यात वणीतील दोन व्यवसायिक सतिश पिंपरे व विवेक पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण मिटले असे वाटत असतानाच आज शिवसैनिकांनी आक्रमक प्रवित्रा घेतला. पोस्ट करणा-या व्यक्तीच्या दुकानात जाऊन शिवसैनिकांनी तिथल्या सामानाची नासधूस केली.

विवेक पांडे यांचे जटाशंकर चौक इथे पांडे ऍन्ड सन्स नावाचे मोबाईल शॉपी आहे. तर सतिष पिंपरे यांची नांदेपेरा रोडवर रसवंती आहे. सकाळी सव्वा दहा ते साडेदहाच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात 40 ते 50 शिवसैनिकांचा जत्था यांनी नांदेपेरा रोडवर असलेल्या पिंपरे यांच्या रसवंतीवर हल्लाबोल केला. यात त्यांनी दुकानातील फ्रिज, साहित्य याला नुकसान पोहोचवत यांची नासधूस केली.

त्यानंतर शिवसैनिकांनी आपला मोर्चा जटाशंकर चौकातील विवेक पांडे यांच्या मोबाईल शॉपीकडे वळवला. पहिल्या घटनेच्या अगदी दहा मिनिटांनी 10.30 च्या सुमारास शिवसैनिक पांडे मोबाईल शॉपीजवळ पोहोचले. त्यावेळी ते दुकान सुरू होते. शिवसैनिकांनी लगेच घोषणा देत या मोबाईल शॉपीवर हल्लाबोल केला. या दुकानात त्यांनी दुकानातील काउंटर तसेचे एसी इत्यादी साहित्याची तोडफोड केली व दुकानातील एसी बाहेर काढून फेकले.

पहिल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ जटाशंकर चौकात पोहोचले. त्यांनी तिथे असणारे विश्वास नांदेकर व सुमारे 40-50 शिवसैनिकांना अटक करत पोलीस ठाण्यात हजर केले. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हल्ल्यात सतिष पिंपरे यांच्या रसवंतीचे सुमारे 1 लाखांचे तर पांडे  मोबाईल शॉपीचे सुमारे 3 लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

आक्षेपार्ह पोस्ट ठरले कारण…
सतिष पिंपरे यांनी वणी ग्राम समाचार या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर नांदेड येथे झालेल्या साधुच्या हत्येविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार व राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह मचकूर असलेला फोटो शेअर केला. तर विवेक पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधी यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले होते. त्याचे पडसाद आज वणीत दिसून आले.

(सविस्तर माहिती आल्यावर ही न्यूज अपडेट करण्यात येईल)

( हे पण वाचा: वणीत सोशल मीडियावर मु्ख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह पोस्ट)

वणी  बहुगुणी आता टेलीग्रामवर . आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील  बातम्या आणि  महत्त्वाच्या घडामोडी मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.