धामणी येथील अत्याचार प्रकरणी 31 ऑक्टोबरला भाजपचा मोर्चा
आमदार बोदकूरवार यांच्या नेतृत्त्वात मारेगाव महिला आघाडी आक्रमक
नागेश रायपुरे, मारेगाव: धामणी प्रकरणावर आमदार संजयरेड्डी बोदकुरवार आणि भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ नराधम आरोपीस फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने येत्या 31 ऑक्टोबरला मारेगाव येथील पोलीस स्टेशनवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. असे स्थानिक विश्रामगृहात 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी जाहीर केले.
राज्यात महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होत आहे. एका 5 वर्षीय चिमुकलीवर एका 40 वर्षीय नराधमांने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील धामणी येथे 26 ऑक्टोबर रोजी घडली. राज्यात महिला सुरक्षित राहल्या नाहीत. अत्याचाराच्या घटना राज्यात नियमित घडत आहेत. असे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार पत्रकार परिषदेत म्हणालेत.
मारेगाव तालुक्यातील धामणी येथे पाच वर्षांच्या बालिकेवर एका 40 वर्षीय नराधमांने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ही मानवजातीला काळिमा फासणारी आहे. अशा प्रकारच्या घटना राज्यात पुन्हा घडू नये म्हणून हा खटला तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. घटनेतील नराधम आरोपीस फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी महिला आघाडीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
हा मोर्चा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करून ,घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काढण्यात येणार आहे.अशीही माहिती पत्रकार परिषदेत आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी दिली आहे.
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्यासह भाजपचे जिल्हा संघटक शंकर लालसरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शहर अध्यक्ष विलास चिंचुलकर, नगरसेवक प्रशांत नांदे, महिला आघाडीच्या नगरसेविका सविता दरेकर, शोभाताई नक्षणे, पांढरे, दारुडे, अनुप महाकुलकर आदी उपस्थित होते.
परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली असता, परतीच्या पावसाने कापूस व सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांत सापडला आहे. होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विषयांवर प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय देऊ. वणी विधानसभा क्षेत्र हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा, या मागणीसाठीसुद्धा डिसेंबर महिन्यात आंदोलन करू अशीही माहिती आमदार बोदकूरवार यांनी दिली.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक