धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत विविध कार्यक्रम
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वृक्षारोपण आणि फळवाटप कार्यक्रम
विवेक तोटेवार, वणी: पर्यावरणाच्या रक्षराणासाठी वृक्षारोपण हाच सर्वोत्तम पर्याय आहे. पर्यावरणाचा आपल्याला आरोग्याशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे एक डॉक्टर या नात्याने परिसराच्या विकासासोबतच आरोग्यालाही प्रथम प्राधान्य देऊन आम्ही हे काम हाती घेतले आहे. वृक्षाचे ख-या अर्थाने जतन झाल्यास व ती वाढवल्यास शुद्ध हवा मिळेल व त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. केवळ झाडे लावून नाही तर तर ती जगवली देखील पाहिेजे तेव्हाच वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी झाला असे म्हणता येईल. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी केले. वणीत रविवारी सकाळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
15 जुलैला महाराष्ट्रीची धडाडणारी तोफ धनंजय मुंडे यांचा 44 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त वणीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी वणी-वरोरा रोडवर 44 कडूलिंबाची झाडे लावण्यात आली. कडुलिंबाच्या झाडांची लवकर वाढ होते. तसेच दाट सावली आणि अधिक प्रमाणात ऑक्सिजन देणारे अशी या झाडाची ओळख आहे. त्यामुळे वृक्षरोपणासाठी या झाडांची निवड करण्यात आली.
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर आनंद बालसदन व अंध व अपंग विद्यालय वागदरा येथे फळवाटप व बिस्किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तिथे विद्यार्थ्यांना फळ व बिस्किटे वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं.
सोमवारी वही व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम
सोमवारी धनजंय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीतील आदर्श हायस्कुलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वही आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले जाणार आहे. अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ आणि जिद्द आहे. मात्र आज वाढलेली महागाई यामुळे वही घेणे जमत नाही. त्यामुळे अशा मुलांना शैक्षणिक मदत व्हावी हा उद्देश ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या वही आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाणार आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयसिंग गोहोकार, राजाभाऊ बिलोरिया, महेश पिदूरकर, प्रा. रविंद्र मत्ते,आशिष मोहितकर, रामकृष्ण वैद्य, टोंगे ताई, विजया आगबत्तलवार, राजू उपरकर, सूर्यकांत खाडे, सिराज सिद्धीकी, व मोठ्या प्रमाणमात कार्यकर्ते उपस्थित होते.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…