धानोरा व मुकूटबन येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

0

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील धानोरा येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पासून पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला होता. आतापर्यंत तीन युवकांसह १५ जनावरांना चावा घेतला. पुन्हा दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी पिसाळलेला कुत्रा दिसल्यामुळे गावकऱ्यांनी त्याला ठार मारण्यासाठी पाठलाग केला. पण कुत्रा सापडला नाही. शनिवारी मुकुटबनात पिसाळलेल्या कुत्र्याने 18 लोकांना चावा घेतल्यामुळे परीसरात कुत्र्याची दहशत आहे.

शुक्रवारी रात्री धानोरा येथील सरपंच वैशाली संतोष माहुरे ह्यांनी पशुविभागाशी उपचाराकरिता संपर्क साधला असता संबधीत विभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होऊ शकला नाही. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता ते सातारा येथे प्रशिक्षणासाठी गेले असुन त्यांचा प्रभार पशुवैद्यकीय अधिकारी वैभव वाकडे ह्यांच्याकडे आहे. वाकडे यांनी स्वतः येण्यास तसंच त्यांच्या विभागाच्या अन्य एकाही कर्मचाऱ्याला रात्रीला घटानास्थळी पाठवण्यास असमर्थता दर्शवली, त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.

शनिवारला पशुवैद्यकीय विभागाचे पट्टीबंधक कर्मचारी सतिश धांडेकर व सामवार ह्यांनी भेट दिली. पण तालुक्यातील 11 ही पशू चिकीत्सालयात रॅबीजचे ईंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे जनावरे मालकाना मेडीकल मधुन रॅबीजची लस आणायला सांगितले. आठ जनावरांना रॅबीजची लस टोचण्यात आली.

दोन लोकानी लोकांनी स्वतः आपल्या जनावरांना लस टोचली. पुन्हा काही बाधित जनावरे उपचाराविनाच आहेत अशी माहीती धानोरा येथील अक्षय गावंडे यानी दिली. धानोरा येथील सुरेश बरपटवार, श्रीधर मासटवार आणि यश वासाड ह्या तीन युवकाला कुत्र्याने चावा घेतल्यामुळे त्यानी झरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन रॅबीज चे इंजेकशन घेतले. पण जनावरानांना शासनाकडुन मोफत रॅबीज चे इंजेक्शन न मिळाल्यामुळे नागरिकांत रोष आहे.

दुसऱ्या घटनेत मुकुटबन येथे शनिवारला पिसाळलेल्या कुत्र्याने 18 लोकांना चावा घेतला त्यामुळे लोकानी मुकुटबन येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी चारथळ यांनी मुकुटबन येथील १६ लोकांना व रुइकोट येथील एका इसमाला रॅबीजचे इंजेक्शन दिले. त्यापैकी ८ लोकाना २-३ जागेवर पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे यवतमाळला सिरम इनोग्लोबीन नावाचे इंजेक्शन घेण्यासाठी रेफर करण्यात आले. त्यामुळे परीसरात कुत्र्याची दहशत असून नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.