दिनानाथ आत्राम गुरुजी यांचा वारीत वाढदिवस साजरा

गेल्या 10 वर्षापासून पालखीचे चोपदार म्हणून काम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक पालखी पंढरपूरला जातात, वणी येथील नंदेश्वर देवस्थान येथूनही दरवर्षी जगन्नाथ महाराजांची पालखी या सोहळ्याला जात असते, या पालखीमध्ये चोपदार म्हणून काम पाहत असलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ आत्राम यांचा वाढदिवस या वारीमध्ये साजरा करण्यात आला. वणी येथील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात नेहमीच हिरीरीने भाग घेणारे आत्राम गुरुजी सेवानिवत्तीनंतर गेल्या 10 वर्षा पासून नियमित आषाढी एकादशी निमित्त वारी करीत आहे. त्यांचा वाढदिवस 1जुलै ला दर वर्षी वारी मध्ये साजरा केला जातो, तहसील कार्यालयात निवडणूक विभागात मोफत सेवा देणारे, 2 मुलींना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करणारे दानशूर व्यक्ती म्हणून गुरुजींची ओळख आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.