नेत्रदान पंधरवाड्यानिमित्त दिशा आणि प्रयास संघटनेचे विविध कार्यक्रम

दृष्टी २०२० अंतर्गत शांघाई येथून अमित वाईकर यांनी साधला संवाद

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात विविध कार्यक्रम आणि उपक्रम होतात. या निमित्ताने दिशा ग्रुप, दिशा एज्युकेशन फाऊंडेशन, दिशा आय बँक आणि प्रयास अमरावती या सामाजिक संस्थांनी मिळून “दृष्टी २०२०” हा ऑनलाईन कार्यक्रम घेतला.

हाकार्यक्रम Facebook आणि YouTube वर Deesha Group व प्रयास अमरावतीच्या पेज वर रोज रात्री ८ वाजता ऑनलाईन पहता येणार आहे. या मध्ये विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्ती आपल्या जीवनातले अनुभव सांगून तरुणांना मार्गदर्शन करत आहे. कार्यक्रम बघणारे प्रेक्षक कंमेंट्स करून आलेल्या पाहुण्यांना थेट आपले प्रश्न विचारू शकतात. ज्या व्यक्तींचे दिशा आय बँकेच्या विविध जिल्ह्यांमधीलशाखांमध्ये मागील एका वर्षात नेत्रदान झाले आहे त्यांचे पुण्यस्मरण केले जाते. त्यांच्या परिवारामधील सदस्यांचा सत्कार देखील करण्यात येतो.

दृष्टी २०२०च्या दुसऱ्या दिवशीच्या प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त अमित वायकर हे शांघाय चीन येथून उपस्थतीत होते. तसेच दिशाआय बँक यवतमाळ शाखेचे मार्गदर्शक डॉ . विजय कावलकर, दैनिक हिंदुस्थान वृत्तपत्राचे ओंकार विलास मराठेदेखील सहभागी झाले होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पुष्कर मुकुंद पल्लीवाळ यांनी केले.

डॉ. विजय कावलकर यांनी भारताला असलेली नेत्रदानाची गरज, सध्याची स्थिती आणि नेत्रदान करताना लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा यावर विचार मांडलेत. लोकांना जागृता केले. ओंकार विलास मराठे यांनी या कोरोना महामारीमध्ये दुसरे देश आणि भारत यांच्या आरोग्यव्यवस्थेवर आपले विचार मांडलेत.

सोबतच नेत्रपेढीचे आरोग्ययंत्रणेमधील महत्त्वदेखील त्यांनी लोकांना सांगितले. दोन्ही अतिथींनी नेत्रदान करण्याचे लोकांना आवाहन केले. दिशा- प्रयास यांच्या नेत्रदान क्षेत्रातील कामाचे कौतुक केले. या नंतर नेत्रदाता परिवारांचा सत्कार करण्यातआला. ज्यामध्ये नेत्रदाते हरिश्चंद्र महाजन, श्रीमती अरुण खडसे, श्रीमती कांचनबेन अतारा यांचे महाजन परिवार, खडसे परिवार, अतारा परिवार यांना सन्मानित करण्यात आले.

अमित वायकर हे Sr. Vice president आहेत Asia-Pacific region Dohler या जर्मन कंपनीमध्ये. ते चिनमध्ये गेल्या १० वर्षांपासून स्थित आहेत. त्यांना राष्टपती रामनाथ गोविंद यांच्या हस्ते “ प्रवासी भारतीय सन्मान २०१९ “ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हे मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील हे नागपूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर आणि गजलकार डॉ.विनय वायकर हे आहेत. डॉ.विनय वायकर हे इंडियन आर्मीमध्ये असताना त्यांनी दोनयुद्धामध्ये आपले योगदान दिले आहे.

अमित वायकरयांनी त्यांचे चीन मधले त्यांचे अनुभव प्रेक्षकांना सांगितले. चीनमध्ये राहूनसुद्धा नागपुरात आपली नाळ जुळवून ठेवलेल्या अमित यांनी चीनची संस्कृती, लोक, काम कारण्याची पद्धत आणि इतर अनुभव सांगितलेत.

आता भारतामधल्या तरुणांनी डिजिटल क्रांतीसाठी कसे तयार राहावे यावर मार्गदर्शन केले. जीवनातील “उरकून टाका” प्रिंसिपल ते स्टार्टअपसाठी आज कशी सुवर्णसंधी आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी दिशा आणि प्रयास हे करत असलेल्या कामांचे देखील कौतुक केले. ही मुलाखत दिशाच्या youtube आणि Facebook वर पहिलीजाऊ शकते.

या कार्यक्रमांमधून सर्वांना एक नवीन दृष्टी मिळेल त्यामुळे नक्की या कार्यक्रम सायंकाळी ८ वाजता बघावा ही विनंती दिशा ग्रुपचे सचिव अरुण गावंडे व प्रयास अमरावतीचे संचालक डॉ अविनाश सावजी यांनी सर्वांना केली आहे.

अमरावती मध्ये दिशा ग्रुप द्वारे संचालित दिशा आय बँक दहा वर्षांपासून नेत्रदानासाठी २४ तास सेवा देत आहे. मरणोत्तर नेत्रदानासाठी दिशा आय बँकेला – 9899898667 / 8275539754 / 7378656145. दिशा ग्रुपच्या अधिक माहितीसाठी तसेच आनलाईन नेञदानाच्या संकल्पासाठी www.deeshagroup.org या संकेतस्थळावर भेट द्यावी.

भारतासमोर अंधत्वाची एक मोठी समस्या उभी आहे. नेत्रदानामोळे दोन कोर्नेअल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा-आठ तासान पर्येंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्यूनंतर ताबडतोब दिशा आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.