ग्रामपंचायत शिबला तर्फे दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप
7 व्यक्तींना 3 हजार प्रमाणे 21 हजारांचे धनादेश वाटप
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील तसेच घनदाट जंगलाने व्यापलेल्या सर्कल मधील शिबला ग्रामपंचायतने स्वतः पुढाकार घेऊन गावातील 9 दिव्याग व्यक्तींना 14 वित्त आयोगातील निधीतून निधी वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत मधील टॅक्स व इतर निधीतील 5% निधी हा गावातील दिव्याग करिता असतो. या निधीचा वापर दिव्याग लोकांच्या मदती करिता त्यांच्या सोयीनुसार खर्च करावे लागते. परंतु बहुतांश ग्रामपंचायत ही निधी वाटप करीत नाही. किंवा दिव्यागाच्या उपोगाकरिता खर्चही करीत नाही.
शिबला ग्रामपंचायतचे सरपंच सचिव व सदस्य यांनी स्वतः पुढाकार घेऊन लॉकडाऊन च्या काळात दिव्यान्ग व्यक्तीला आर्थिक आधार होणार या उद्देशाने गावातील दिव्यान्ग शिवाजी भीमा मेश्राम, श्रीराम मारोती टेकाम, मंगला श्रीराम मेश्राम,प्रणिता श्याम मडावी, बंडू बाबाराव कुडमेथे, प्रणय वासुदेव पुसाम, जगदीश अरुण कनाके यांना सरपंच बारीकराव टेकाम व ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य उमेश परताम, आमकर करवते सामाजिक कार्यकर्ते बाळु दुधकोहळे उपस्थित होते.
आधीच लॉकडाऊन मुळे गोरगरीब रोजमजुर काम करणाऱ्या लोकांचे काम बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अश्यातच दिव्यान्ग व्यक्तींना आधार याच निधीने होऊ शकते असा विचार करून ग्रामपंचायतने धनादेश वाटप करून दिव्यान्ग व्यक्तींना एका प्रकारे आधारच दिल्याचे बोलले जात आहे..