दिव्यांग व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर साहित्यांचे वाटप
पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडीया यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ, दिव्यांग तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. स्थानिक रंगनाथ स्वामी मंदिरात हा स्माईल फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 155 विद्यार्थ्यांना कुबडी, वॉलीबॉलची नेट, क्रिकेटचे साहित्य इत्यादीचे वाटप करण्यात आले. तर वणी येथील वृद्धेला वॉकर देण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. मुन्ना महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगनाथ स्वामी देवस्थान येथे स्माईल फाउंडेशन व जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या वतीने विजय चोरडिया यांचा कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुन्ना महाराज, मुख्याध्यापक भास्कर दुमोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे गौरकर, अनिल जवळकर व बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श दाढे यांनी केले तर सुत्र संचालन रमेश बोबडे यांनी केले. उपस्थितांचे आभार तन्मय कापसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पीयूष आत्राम, विश्वास सुंदराणी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, तन्मय कापसे, अनिकेत वासरिकर, कार्तिक पिदुरकर, जगदीश गिरी, कुणाल आत्राम, निकेश खाड़े, प्रसाद पिपराडे, गौरव कोरडे, तुषार वैद्य, सचिन भोयर, सचिन काळे, मयूर भरटकर, भूषण पारवे इत्यादींनी परिश्रम घेतले.
Comments are closed.