लॉयन्स क्लब वणी द्वारा गरजूंना किटचे वाटप

वणी उपविभागात सुमारे 4 हजार किटचे वाटप

0

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्यामुळे वणी तालूका तसेच मारेगाव व झरी जामणी तालुक्यातील परप्रांतीय मजूर व गावातील रोजंदारीवर गुजराण करणारे मजूर कुटुंबांवर उपाशी राहण्यचाची वेळ आली आहे. त्यामुळे लॉयन्स क्लब वणी व लॉयन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय वणीच्या वतीने आमदार लॉयन संजीवरेड्डी बोदकुरवार व उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांचे मार्गदर्शनाखाली गरजुंना किटचे वाटप करण्यात आले आहे.

या किटमध्ये कनिक, तांदुळ, तुरदाळ, खादय तेल व साबन याचा समावेश आहे. लॉयन्स संस्थेतर्फे आतापर्यंत 4000 किटचे गरजुंच्या प्रत्यक्षघरी जावुन वाटप करण्यात आले आहे. या धान्यवाटप उपक्रमाअंतर्गत व वणी शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील पट्टाचारा नगर, दत्त मंदिर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर साई मंदीर महाविर भवन जैताई मंदिरपरिसरातील गायकवाड फेल , तसेच फुकटवाडी, कनकवाडी, विठ्ठलवाडी, देशमूखवाडी, शास्त्रीनगर, ढिवरपुरा, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, गांधी नगर, गोकुल नगर, लालपुलीया, तसेच राजूर कॉलरी, नरसाळा, सैदाबाद, कायर.

मारेगाव शहरातील नागरिक, भालेवाडी पोड, झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन, मांगली, सालेभट्टी, मांगुर्ला, लहान व मोठा, दाभाडी लहान व मोठी, दाभाडी पोड, शिवपोड , झमकोला, वरपोड, निमनी दरारा, या गावातील गरजूंना 4000 धान्याच्या किटचे दि 4. एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान वितरण करण्यात आले.

यावेळी लॉयन्स क्लबच्या अध्यक्षा ललीता बोदकुरवार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नरेंद्र नगरवाला, दत्तात्रय चकोर, डॉ. रविकांत देशपांडे, प्रमोद देशमुख, शमीम अहेमद, डॉ. के. आर लाल, महेंद्र श्रीवास्तव, रमेश बोहरा, चंद्रकांत जोबनपुत्रा, सुधीर दामले, राजाभाउ पाथ्रडकर, बलदेव खुंगर, शांतीलाल पांडे, शाळेचे प्राचार्य प्रशांत गोडे शिक्षक व कर्मचा-यांनी सहकार्य केले. लॉयन्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने लॉकडाऊन घोषीत होण्यापुर्वी कोरोना संसर्गाबाबत नागरीकांमध्ये जागरूकता निर्मण करण्यासाठी वणी शहरात बॅनर व छापील पत्रकांचे नागरीकांना वितरण करून जनजागृती करण्यात आली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.