मारेगावमध्ये डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप

विश्वास नांदेकर यांच्यातर्फे पीपीई किटचे वाटप

0 281

नागेश रायपुरे, मारेगाव: मंगलाताई विश्वास नांदेकर यांच्या स्मृर्थी प्रित्यर्थ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या हस्ते मारेगाव येथील बदकी भवन येथे तालुक्यातील शासकीय तथा निमशासकीय डॉक्टर लोकांचा सन्मान करून त्यांना पी.पी.ई. किटचे वाटप करण्यात आले.

कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या आरोग्यसेवे साठी 24 तास कर्तव्यावर राहून वैद्यकीय सेवा देणारे तालुक्यातील शासकीय तथा निमशासकीय डॉक्टर लोकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यात N 95 व साधे 25 मास्क, हॅन्ड सानिटायझर 5 लिटर, सोडियम हायड्रोक्लोराईड 5 लिटर कॅन, गॉगल, हॅन्डग्लव्ज आदी वस्तूंचा समावेश आहे.

यावेळी विश्वास नांदेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी अर्चना देठे, डॉ. सपना केलोडे, डॉ. पाटील यांनी उपस्थितांना कोरोना व्हायरस बाबत मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर  नगराध्यक्षा रेखा मडावी, ठाणेदार जगदीश मंडलवार, डॉक्टर असोशियनचे डॉ. डाखरे, माजी नगराध्यक्ष इंदू किन्हेकार आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमासाठी सेनेचे तालुका प्रमुख तथा उपसभापती संजय आवारी, राजू मोरे, सुनील गेडाम, गोविंदा निखाडे, दुमदेव बेलेकार, नगरसेवक सुनीता मस्की, सुभाष बदकी युवासेनेचे विक्रांत चचडा, मयूर ठाकरे, गणेश आसुटकर, श्रीकांत सांबजवर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीराम मस्की यांनी तर आभार अभय चौधरी यांनी मानले.

Comments
Loading...