जितेंद्र कोठारी, वणी: निसर्ग संवर्धन व त्याचे जतन व्हावे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला याची जाणीव व्हावी. निसर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी कायमचं प्रयत्नशील राहावे. या साठी वणीतील काही तरुणांनी पर्यावरण प्रति सामाजिक बांधिलकी जोपासत जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून नागरिकांना विविध झाडांच्या कलमा भेट दिल्या.
कोरोना संसर्गजन्य काळात सर्वाधिक गरज भासली ती ऑक्सिजनची, प्रत्येकाने जर आपलं कर्तव्य समजून एक झाड ते मोठं केलं असत तर आज ही परिस्थिती उदभवली नसती. भविष्यात ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता आज वणी शहरातील नागरिकांना सर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडे भेट दिली. यावेळी शहरातील शुभम पिंपळकर, शुभम गोरे, सुमंत बच्चेवार, शुभम इंगळे, समीर बच्चेवार विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
हे देखील वाचा: