बहुगुणी डेस्क, मारेगाव: मारेगाव येथे शनिवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. खा. प्रतिभा धानोरकर व मा. आ. वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात वसंत जिनिंगचे अध्यक्ष व काँग्रेसचे झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. शहरात ठिकठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय करतात. कधी पाऊस तर कधी उन्हाचा त्यांना सामना करावा लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने भाजी, फळ, कपडा विक्रेते यासह फूटपाथवर बसून उदरनिर्वाह करणा-या विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आली. यामुळे या छोट्या विक्रेत्यांना मोठा आधार मिळाला आहे. विक्रेत्यांनी आशिष खुलसंगे यांचे आभार मानले. यावेळी मारेगाव काँग्रेस तालुकाध्यक्ष मारोती गौरकार, कृ.उ.बा.समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, वसंत जिनिंगचे संचालक रवी धानोरकर, जयनारायण बदकी, अंकुश माफूर, नगरसेवक आकाश बदकी, माजी नगरसेवक उदय रायपुरे, प्रमोद लोणारे तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.