पुरुषोत्तम नवघरे, वणी: नुकतेच दिग्रस नगर पालिकेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नगर परिषद कर्मचाऱ्यांचा जिल्हा स्तरिय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला. त्यात वणी नगर परिषद सहभागी होऊन वैशिष्ट्यपूर्ण यश मिळविले आहे. त्याबद्दल यशस्वी खेळाडूंना वणी नगर पालिकेतर्फे सन्मानित करण्यात आले आहे.
दिग्रस येथे दि. 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा स्तरिय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात जिल्यातील 10 नगर परिषद सहभागी झाल्या होत्या. वणी नगर परिषदेच्या कर्मचारी व शिक्षकांनी यात भाग घेऊन कबड्डी व व्हॉलीबाल या सांघिक स्पर्धेत अंतिम फेरीत खेळून द्वितीय क्रमांक मिळविला.
दुहेरी गीत गायन स्पर्धेत दिगांबर ठाकरे व जयप्रकाश सूर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. गायनाच्या वैयक्तिक स्पर्धेत दिगांबार ठाकरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. एक किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत विजय चव्हाण यांनी व 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत कपिल तोमस्कर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ठ चढाई पटू ( रेडर) म्हणून विजय चव्हाण व उत्कृष्ठ बचाव खेळाडू ( डिफेंडर) म्हणून किशोर चौधरी यांना या स्पर्धेत गौरविण्यात आले.
सांघिक व वैयक्तिक खेळामध्ये विजय मिळविणाऱ्या स्पर्धकांचा वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी नगर परिषदेतील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed.